पीएम विश्वकर्मा योजना

author
जमा करणार shahrukh on Thu, 20/06/2024 - 16:37
केंद्र सरकार CM
Scheme Open
PM Vishwakarma Yojana Information Logo
हायलाइट्स
  • रु. १,००,०००/- पर्यन्त कर्ज ५% व्याजदराने पहिल्या टप्प्यात देण्यात येईल.
  • रु. २,००,०००/- पर्यन्त कर्ज ५% व्याजदराने दुसरयटप्प्यात देण्यात येईल.
  • कौशल्य प्रशिक्षण देखील दिले जाईल.
  • स्टायपेंड रु. ५००/- प्रती दिन प्रशिक्षण काळवादहिदारम्यान दिले जाईल.
  • रु. १५,०००/- हे ॲडव्हान्स टूल किट खरेदीकरण्यासाठी दिले जातील.
  • पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देखील देण्यात येतील.
  • पहिल्या टप्प्यातील कर्जाचा कालावधी हा १८ महिन्यांचा आहे.
  • दुसऱ्या टप्प्यातील कर्जाचा कालावधी हा ३० महीने आहे.
  • प्रोत्साहन रु १/- चे प्रती डिजिटल व्यवहार.
Customer Care
योजनेचा आढावा
योजनेचे नाव पीएम विश्वकर्मा योजना.
लाँच तारीख १७ सप्टेंबर २०२३.
फायदे
  • रु. २,००,०००/- पर्यन्त कर्ज २ टप्यात ५% व्याज दराने.
  • कौशल्य प्रशिक्षण.
  • रु. ५००/- प्रतीदिवस कौशल्य प्रशिक्षणादारम्यान स्टायपेंड.
  • रु. १५,०००/- टूल्स खरेदीसाठी.
  • पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र.
लाभार्थी कलाकार आणि कारागीर.
नोंडल विभाग सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय.
सबसक्रीपशन योजनेबाबत अपडेट मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा.
अर्ज करण्याची पद्धत

परिचय

  • पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणा ही अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणातून केली.
  • पीएम विश्वकर्मा योजनेचे पूर्ण नाव पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना असे आहे.
  • ही अजून दुसऱ्या नावांनीही ओळखले जाते म्हणजेच पीएम विकास योजना किंवा पीएम विश्वकर्मा योजना किंवा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना.
  • १६ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने संपूर्ण भारतात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लागू करण्याची मान्यता दिली.
  • हे सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
  • १७-०८-२०२३ रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पीएम विश्वकर्मा योजना सुरू होणार आहे.
  • पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे कलाकार, कारागीर आणि लहान व्यवसाय मालकांना आर्थिक मदत करणे आणि त्यांना भांडवलही उपलब्ध करून देऊन त्यांना व्यवसाय वाढवण्यास मदत करणे हा आहे.
  • रु १३,०००/-कोटी हा पीएम विश्वकर्मा योजनेच्या सुरळीत अमलबजावणीसाठी भारत सरकारचे बजेट आहे.
  • सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय हे पीएम विश्वकर्मा योजनेचे नोडल मंत्रालय आहेत.
  • रु. १,००,०००/- सर्व पात्र असलेल्या कलाकार आणि करगिरांना त्यांच्या व्यवसायासाठी केवळ ५% व्याजदर प्रदान केला जाईल.
  • आणि जर त्यांनी यशस्वीपणे कर्जाची रक्कम ही परत केली तर ते पुन्हा रु. २,००,०००/- पर्यन्त ५%व्याजदारवर घेऊ शकतात.
  • भांडवल कर्जाव्यतिरिक्त, पीएम विश्वकर्मा योजनेदरम्यान कलाकार आणि कारागीरांना कौशल्य प्रशिक्षण देखील प्रदान केले जाईल.
  • प्रती दिन रु. ५००/- इतके स्टायपेंड हे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेदवारे प्रशिक्षणासाठी निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना दिले जातील.
  • शिल्पकार आणि कारागीर यांना त्यांच्या व्यवसायासाठी आधीच साधन खरेदीकरण्यासाठी रु. १५,०००/- ची आर्थिक मदत करण्यात येईल.
  • भारत सरकार लाभार्थ्याना त्यांच्या ओळखीसाठी पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र सुद्धा प्रदान करण्यात येईल.
  • १८ पारंपारिक व्यवसायांचा समावेश भारत सरकारने पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत केला आहे.
  • १६४ पेक्षा जास्त मंगसवर्गातील ३० लाख कुटुंबांना कव्हर केले जाण्याची अपेक्षा आहे आणि ते पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेणार आहेत.
  • पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कारागीर आणि शिल्पकार यांना अजून थोडी वाट पहावी लागेल.
  • पीएम विश्वकर्मा योजना भारत सरकार १७ सप्टेंबर २०२३ रोजी अधिकृतपणे सुरू करेल.
  • आता भारत सरकारने पीएम विश्वकर्मा योजनेची मार्गदर्शक तत्वे आणि अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.
  • चित्रकार पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत.
  • पात्र कारागीर आणि शिल्पकार पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी २ प्रकारे अर्ज करू शकतात :-
PM Vishwakarma Yojana Benefits

योजनेचे फायदे

  • पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागीर आणि शिल्पकार लोकांना खाली दिलेले फायदे देण्यात येतील :-
    • रु. १,००,०००/- पर्यन्त कर्ज ५% व्याजदराने पहिल्या टप्प्यात देण्यात येईल.
    • रु. २,००,०००/- पर्यन्त कर्ज ५% व्याजदराने दुसरयटप्प्यात देण्यात येईल.
    • कौशल्य प्रशिक्षण देखील दिले जाईल.
    • स्टायपेंड रु. ५००/- प्रती दिन प्रशिक्षण काळवादहिदारम्यान दिले जाईल.
    • रु. १५,०००/- हे ॲडव्हान्स टूल किट खरेदीकरण्यासाठी दिले जातील.
    • पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देखील देण्यात येतील.
    • पहिल्या टप्प्यातील कर्जाचा कालावधी हा १८ महिन्यांचा आहे.
    • दुसऱ्या टप्प्यातील कर्जाचा कालावधी हा ३० महीने आहे.
    • प्रोत्साहन रु १/- चे प्रती डिजिटल व्यवहार.
PM Vishwakarma Yojana Eligible Trade

पात्रता निकष

  • अर्जदार भारतीय रहिवासी असावा.
  • अर्जदार कारागीर किंवा शिल्पकार असावा.
  • अर्जदाराचे वे १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  • आर्जदाराने पीएमईजीपी, पीएम स्वनिधी किंवा मुद्रा कर्ज याचा लाभ घेऊ नये.

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत पात्र व्यवहार

  • खालीलपैकी कोणत्याही व्यवसायात गुंतलेले कारागीर किंवा शिल्पकार पीएम विश्वकर्मा योजना (पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना) अंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र आहेत :-
    • मासेमारी नेट मेकर.
    • शिंपी. (दरजी)
    • धोबी. (धोबी)
    • गारलँड मेकर. (मालाकर)
    • न्हावी. (नाई)
    • बाहुली आणि खेळणी बनविणारा. (पारंपारिक)
    • बास्केट/चटई/झाडू/कॉयर विणकर.
    • गवंडी. (राजमिस्त्री)
    • चांभार(चर्मकार)/ मोची/ चप्पल कलाकार.
    • शिल्पकार (मूर्तिकार, दगड फोडकाम), स्टोन ब्रेकर.
    • कुंभारकाम. (कुंभार)
    • सोनार. (सोनार)
    • कुलूप दुरुस्ती करणारा.
    • हॅमर आणि टूल किट मेकर.
    • लोखंडच्या वस्तु घडवणारे. (लोहार)
    • आर्मरर.
    • नौका निर्माता.
    • सुतारकाम. (सुतार)
PM Vishwakarma Yojana Eligible Trades

आवश्यक कागदपत्रे

  • पीएम विश्वकर्मा योजनेला अर्ज करतांना खाली दिलेले कागदपत्रे आवश्यक आहेत :-
    • आधार कार्ड.
    • मतदार ओळखपत्र.
    • व्यवसायाचा पुराव.
    • मोबाइल नंबर.
    • बँक खाते तपशील.
    • उत्पन्नाचा दाखला.
    • जातीचा दाखला. (लागू असल्यास)

योजनेची प्रगती

PM Vishwakarma Yojana Application Status

अर्ज कसा करावा

  • पात्र असलेले कलाकार आणि कारागीर ऑनलाइन अर्जाद्वारे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • पीएम विश्वकर्मा योजनेचा ऑनलाइन अर्ज १७ सप्टेंबर २०२३ पासून पीएम विश्वकर्मा योजना अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे.
  • लाभयार्थ्याने त्यांच्या मोबाइल क्रमांक आणि आधार करडच्या मदतीने प्रथम स्वतःची नोंदणी करावी.
  • पीएम विश्वकर्मा योजना वेबसाइट ओटीपी प्रमाणीकरनाद्वारे लाभरथींचा मोबाइल नंबर व आधार कार्ड पडताळणी करेल.
  • पडताळणीनंतर, स्क्रीनवर पीएम विश्वकर्मा योजनेचा नोंदणी फॉर्म दिसून येईल.
  • पीएम विश्वकर्मा योजनेच्या नोंदणी फॉर्ममध्ये कलाकार किंवा कारागीराचे नाव, पत्ता, व्यापार संबंधीत तपशील यासारखे मूलभूत तपशील भरा.
  • आता सबमिट करण्यासाठी सबमीट बटणावर क्लिक करा.
  • भविष्यात संदर्भासाठी पीएम विश्वकर्मा डिजिटल आयडी आणि प्रमाणपत्र डाउनलोड करावे.
  • आता त्याच पीएम विश्वकर्मा पोर्टलवर लॉगइन करा आणि योजनेच्या वेगवेगळ्या घटकांसाठी अर्ज करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • कन्सिड्रेशनसाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा अर्ज सबमीट करा.
  • त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाची पडताळणी संबंधीत अधिकारी करतील.
  • आणि व्यावसायिक बँका,प्रदेशीकगरमिन बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या मदतीने पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तारणमुक्त मोफत कर्ज लाभार्थ्यांमध्ये वितरित केले जाई.
  • कलाकार आणि कारागीर देखील त्यांच्या जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन नोंदणी करू शकतात आणि पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • भारत सरकार पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणीसाठी पीएम विश्वकर्मा योजना मोबाइल ॲप विकसित करण्याची देखील योजना करणार आहे.
    PM Vishwakarma Yojana How to Apply

महत्वाच्या लिंक्स

संपर्क माहिती

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: कर्ज

Sno CM Scheme Govt
1 Pradhan Mantri Mudra Yojana (PMMY) केंद्र सरकार
2 Divyangjan Swavalamban Scheme केंद्र सरकार
3 JanSamarth Portal National Portal for Credit Linked Government Scheme केंद्र सरकार
4 PM SVANidhi Scheme केंद्र सरकार
5 Credit Guarantee Scheme for Startups केंद्र सरकार
6 PM Vidyalaxmi Scheme केंद्र सरकार

Comments

Permalink

Your Name
Lal Bahadur
प्रतिक्रिया

My very need a business loan .

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.