महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

author
जमा करणार shahrukh on Thu, 10/10/2024 - 14:11
महाराष्ट्र CM
Scheme Open
Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana Logo
हायलाइट्स
  • गॅस सिलिंडर मोफत दिला जाईल.
  • दर वर्षाला ३ गॅस सिलिंडरचे रिफील मोफत देण्यात येईल.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.
वर्ष लाँच केलेले २०२४.
फायदे दर वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर.
लाभार्थी महिला महाराष्ट्रातील रहिवासी.
नोडल विभाग अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचा.
सब्स्क्रिप्शन योजना बद्दल माहिती मिळविण्यासाठी येथे सदस्यता घ्या.
अर्ज करण्याची पद्धत स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

परिचय

  • महाराष्ट्र सरकार द्वारा २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्प सादर करताना अनेक कल्याणकारी योजना जाहीर केली होती.
  • सरकारद्वारे नवींन योजना जाहीर केली आहे त्यामध्ये स्वच्छ इंधन पुरवान्यासाठी आणि महिलांच्या आरोग्याचा समस्या कमी करण्याच्या मुख्य उद्देश्य आहे.
  • या योजनेचा नाव "महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना" आहे.
  • हि योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.
  • हि योजना इतर काही नावांनी ओळखली जाईल जसे "महाराष्ट चीफ मिनिस्टर स्कीम" किंवा "महाराष्ट् मुख्यमंत्री अन्नपूर्णा स्कीम" किंवा "महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना".
  • अन्न, नागरी पुरवठा  आणि ग्राहक संरक्षण विभाग हा या योजनेचा नोडल विभाग आहे.
  • आता प्रत्येक घराला मोफत गॅस सिलिंडर मिळेल ते एलपीजी कनेक्शन घेऊ शकते आणि त्यांची स्वयंपाकाची पद्धत इंधन स्वच्छ करण्यासाठी बदलू शकतील.
  • महाराष्ट शासनाद्वारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना दर वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत दिले जाईल.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दर वर्षाला ३ गॅस सिलिंडर फक्त त्या महिला लाभार्थ्यांना देण्यात येईल ज्यांच्या नावावर पीएम उज्जवला योजना गॅस कनेक्शन आहे.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेद्वारे लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ३ वेळा मोफत गॅस सिलिंडर रिफिलच्या लाभ घेऊ शकतात.
  • लाभार्थी महिला दर महिन्याला फक्त एक गॅस सिलिंडर भरू शकते.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी महिला मूळ किंमतीवर गॅस सिलिंडर खरेदी करू शकते.
  • महाराष्ट्र सरकार गॅस सिलिंडरच्या अनुदानाची रक्कम तेल कंपन्यांना परत करावी लागेल त्यांनतर तेल कंपन्या ते अनुदान महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करतील.
  • १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरवर फक्त अनुदान दिले जाईल व्यावसायिक गॅस सिलिंडरवर कोणतेही अनुदान दिले जाणार नाही.
  • दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अनुदान वितरण प्रक्रिया भिन्न आहे.
  • माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना एलपीजी सिलिंडरची संपूर्ण मूळ किंमत अनुदान मिळेल.
  • पीएम उज्जवला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरच्या खरेदीवर केंद्राकडून अनुदान दिले जाणारे वजा करून सबसिडी मिळेल.
  • महाराष्ट्रातील सुमारे ५२,१६,४१२ कुटूंबांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी वर्षभरात ३ मोफत गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  • दोन्ही योजनेसाठी लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपोआप पात्र आहेत.

योजनेचे फायदे

  • महाराष्ट्र शासनद्वारा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल :-
    • गॅस सिलिंडर मोफत दिला जाईल.
    • दर वर्षाला ३ गॅस सिलिंडरचे रिफील मोफत देण्यात येईल.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण

  • महाराष्ट्र शासनद्वारा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दोन्ही योजना महिला लाभार्थ्यांना एलपीजी सिलिंडरच्या किंमतीची परतफेड खाली दिली आहे :-
  • पीएम उज्जवला योजनेचा लाभार्थीसाठी

    • आता सध्या प्रधानमंत्री उज्जवला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ८३० रु. एलपीजी सिलिंडरची बाजारातील किंमत आहे.
    • लाभार्थी महिलांना १४. २ किलोचा एलपीजी सिलिंडर मूळ किंमतीवर खरेदी करावी लागेल.
    • लाभार्थीच्या बँक खात्यात केंद्र सरकार ३०० रु. ची परतफेड करणार आहे.
    • महाराष्ट्र सरकार तेल कंपनाच्या बँक खात्यात उर्वरित ५३० रु. हस्तांतरित करणार आहे.
    • तेल कंपन्या हि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अनुदानाची रक्कम महिलांचा बँक खात्यात वर्ग करतील.
    • दर महिन्याला व सिलिंडर आणि वर्षभरात एकूण ३ सिलिंडरवर सबसिडी देण्यात येईल.
      Annapurna Yojana Process for PM Ujjwala Yojana Beneficiary

    माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी

    • माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही एलपीजी सिलिंडर तेल कंपन्यांकडून त्याच्या वास्तविक किंमतीनुसार खरेदी करावे लागेल.
    • तेल कंपन्या या योजनेच्या अंमलबजावणीचे नियमन करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीकडे लाभार्थ्यांची यादी पाठवतील.
    • समिती लाभार्थ्यांची यादी तपासून अंतिम मंजूर यादी वित्त विभागाकडे देण्यात येईल.
    • महाराष्ट्र सरकारचा संबंधित विभाग त्यांनतर थेट एलपीजी सिलिंडरची खरी किंमत माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल.
      Annapurna Yojana Process for Majhi Ladhsmi Bahin Yojana Beneficiary

    पात्रता निकष

    • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खालील पात्रता अटींची पूर्तता करणाऱ्या लाभार्थी महिलांना दर वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत दिले जातील :-
      • लाभार्थी महिला हि महाराष्ट्राची कायमचा रहिवासी असावा.
      • लाभार्थी महिलाकडे पीएम उज्जवला योजनेचे गॅस कनेक्शन असावे.
      • लाभार्थी महिलाच्या गॅस कनेक्शन नावावर असावे.
      • माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थी मोफत गॅस सिलिंडरसाठी पात्र आहेत.
      • फक्त १४.२ घरगुती एलपीजी सिलिंडरवर फायदे दिले जाईल.
      • प्रति रेशनकार्ड प्रति कुटुंब एक व्यक्ती पात्र आहे.
    Maharashtra Mukhyamantri Annapurna Yojana Eligibility Criteria

    आवश्यक कागदपत्रे

    • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेद्वारा दरवर्षी एलपीजी सिलिंडरच्या मोफत रिफिलिंगचा लाभ घेताना खालील कागदपत्रे आवश्यक आहे :-
      • महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
      • आधार कार्ड.
      • माझी लाडकी बहीण योजना अर्ज क्रमांक.
      • मोबाईल नंबर.
      • पासपोर्ट साईज फोटो.
      • पीएम उज्जवला योजना गॅस पासबुकची कॉपी.

    अर्ज कसा करावा

    • महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री श्री. अजित पवार २८ जून २०२४ रोजी पुरवणी अर्थसंकल्प सादर करत आहेत.
    • महिलांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली.
    • सध्या, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे.
    • मार्गदर्शक तत्त्वानुसार पीएम उज्जवला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी  महिलांना दर वर्षाला ३ एलपीजी सिलिंडर मिळविण्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
    • या दोन्ही योजनांच्या महिला लाभार्थी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळण्यास आपोआप पात्र ठरते.
    • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही.
    • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाचे कोणतीही अधिकृत वेबसाईट उपलब्ध नाही.
    • एलपीजी सिलिंडर लाभार्थी महिलांना त्याच्या वास्तविक किंमतीवर खरेदी करावा लागेल आणि महाराष्ट्र सरकार लाभार्थींच्या बँक खात्यात डीबीटी मोडद्वारे किंमत परत देणार आहे.

    महत्वाच्या लिंक्स

    संपर्काची माहिती

Person Type योजना प्रकार Govt

Comments

Permalink

Your Name
Sharmeeli
प्रतिक्रिया

Gas cylinder kabse

Permalink

Your Name
AARTIBAI VALMIK Ghodeswar
प्रतिक्रिया

Please 🙏 gass

Permalink

Your Name
Pinki vijay demde
प्रतिक्रिया

Hame gas chahiye hamare ghr me gas nahi hay pm ji hame Annapurna yojana ka lab dijiye👏

Permalink

Your Name
Pinki demde
प्रतिक्रिया

Gas cylinder chahiye hame Annapurna yojana kab se milega hame

Permalink

Your Name
कविता आनंद काळे
प्रतिक्रिया

माझ्या नवराच्या गैस कनेक्शन आहे तर माझ्या नावा वर केले तर मला अन्नपूर्णा योजना चा लाभ मिळल का????

Permalink

Your Name
Gulnar Ishrak Shaikh
प्रतिक्रिया

Document kaha submit Krna h please Rply sir I need this opportunity please

Permalink

Your Name
Rehana khatun shaikh
प्रतिक्रिया

Hame Ghar chahiye.
Plz ghr ki bahot zarurat hai.free me nahi to.
Kam kimat me ghr do.
Plzzzzzzz

Permalink

Your Name
SeemaSunil SONAWANE
प्रतिक्रिया

I have fill the form for free gas cylinder ( mukhya mantri annapurna yojna)

Permalink

Your Name
Aruna chandu wadibhasme
प्रतिक्रिया

I have fill the form free gas cylinder

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.