हायलाइट्स
- नोकरीवर ६ महिन्यांच्या कालावधीत ट्रेनिंग दिले जाईल.
- ट्रेनिंग कालावधीत देण्यात येणारा स्टायपेंड खालीलप्रमाणे राहील :-
- १२वी पास :- रू. ६,०००/-दर महिन्याला.
- आयटीआय/ डिप्लोमा :- रु. ८,०००/-दर महिन्याला.
- पदवी/ पदव्युत्त :- रु. १०,०००/- दर महिन्याला.
संकेतस्थळ
Customer Care
- महास्वयम्ं हेल्पलाइन नंबर :- १८००१२०८०४१.
- कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग हेल्पलाइन नंबर :-
- ०२२-२२६२५६५१.
- ०२२-२२६२५६५३.
- कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग ईमेल:- helpdesk@sded.in.
योजनेचा आढावा |
|
---|---|
योजनेचे नाव | महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजना. |
लॉंच वर्ष | २०२४. |
फायदे | नोकरीच्या ट्रेनिंगवर दर महिन्याला स्टायपेंड. |
लाभार्थी | महाराष्ट्राचे नागरिक. |
नोडल विभाग | कौशल्य, रोजगार,उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग. |
सबस्क्रिबशन | योजनेबद्दल अपडेट मिळवण्यासाठी येथे सबस्क्राईब करा. |
अर्ज करण्याची पद्धत | माझा लाडका भाऊ योजना अर्ज फॉर्म च्या द्वारे. |
परिचय
- महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पनेची पुरवणी विधानसभेत सादर करतांना अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्या.
- माझ्या लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकऱ्या निर्माण करण्याच्या उद्देशाने जाहीर करण्यात आलेली एक योजना आहे.
- महाराष्ट्रातील ११ लाखांहून अधिक विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यापैकी बहुतेकांना योग्य नौकऱ्या मिळू शकत नाही.
- त्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि भविष्यातील चांगल्या नोकरीच्या संधीसाठी,त्यांना तयार करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत सर्व पात्र तरुणांना नोकरीचे ट्रेनिंग दिले जाईल.
- महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग हा या योजनेचा अंमलबजावणी करणारा विभाग आहे.
- या योजनेचे मूळ नाव मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना असे आहे.
- पण ही योजना खास तरुण मुलांसाठी आहे म्हणूनच माझा लाडका भाऊ योजना लोकांमध्ये प्रसिद्ध आहे.
- लोक या योजनेचे नाव “माझा लाडका भाई योजना” किंवा “माझा लडका भाऊ योजना” ह्या नावांनी घेतात.
- महाराष्ट्र सरकार सर्व पात्र तरुणांना औद्योगिक आणि विना औद्योगिक स्थापणांमद्धे नोकरीचे ट्रेनिंग देणार आहे.
- माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत भरती झालेल्या युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार मासिक स्टायपेंड देखील दिले जाईल.
- माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत दर महिन्याला दिले जाणारे स्टायपेंड खालीलप्रमाणे आहे :-
- १२ वी उत्तीर्ण असलेल्या युवकांना दर महिन्याला रु. ६,०००/-.
- आयटीआय किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असलेल्या युवकांना दर महिन्याला रु. ८,०००/-.
- पदवी किंवा पदवी उत्तीर्ण असलेल्या युवकांना दर महिन्याला रु. १०,०००/-.
- माझा लाडका भाऊ योजनेसाठी फक्त १८ वर्षे ते ३५ वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करू शकतील.
- १२ वी, आयटीआय, डिप्लोमा धारक, पदवी, पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थी नोकरीच्या ट्रेनिंगसाठी अर्ज करू शकतात.
- माझा लाडका भाऊ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे १० लाख तरुणांना मासिक स्टायपेंडसह नोकरीचे ट्रेनिंग मिळेल.
- माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत नोकरीसाठी ट्रेनिंग फक्त ६ महिन्यांच्या कालावधीसाठी दिले जाणार आहे.
- अर्जदार युवक हे माझा लाडका भाऊ योजनेसाठी महास्वयम्ं पोर्टल यावर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात.
योजनेचे फायदे
- महाराष्ट्र शासन माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत सर्व पात्र तरुणांना खालील लाभ दिले जातील :-
- नोकरीवर ६ महिन्यांच्या कालावधीत ट्रेनिंग दिले जाईल.
- ट्रेनिंग कालावधीत देण्यात येणारा स्टायपेंड खालीलप्रमाणे राहील :-
- १२वी पास :- रू. ६,०००/-दर महिन्याला.
- आयटीआय/ डिप्लोमा :- रु. ८,०००/-दर महिन्याला.
- पदवी/ पदव्युत्त :- रु. १०,०००/- दर महिन्याला.
पात्रता निकष
- माझा लाडका भाऊ योजनेचे फायदे म्हणजेच नोकरीच्या ट्रेनिंगवर महिन्याच्या स्टायपेंडसह खालील पात्रता पूर्ण करणाऱ्या अर्जदार तरूणांनाच दिले जातील :-
- अर्जदार तरुण हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- अर्ज करणाऱ्या तरुणांचे वय १८ ते ३५ वर्षा दरम्यान असावे.
- अर्ज करणाऱ्या तरुणांची पात्रता १२वी, आयटीआय/ डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर उत्तीर्ण असावे.
- कौशल्य, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
स्थापना आणि उद्योग पात्रता
- उद्योग आणि स्थापना फक्त माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत नोकरी ट्रेनिंगसाठी तरुणांना नियुक्त करण्यासाठी पात्र राहतील जेव्हा ते खालील पात्रता पूर्ण करतील :-
- महाराष्ट्र राज्यात उद्योग/ स्थापना कार्यरत आहे.
- कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभागाच्या वेबसाइटवर नियोक्ता म्हणून नोंदणी केलेली असावी.
- उद्योग/ स्थापना ३ वर्षांपेक्षा जुने असावी.
- उद्योग/ स्थापना ईएसआयसी, डीपीआयआयटी, ईपीएफ आणि उद्योग आधार मध्ये नोंदणीकृत असावे.
आवश्यक कागदपत्रे
- महाराष्ट्र शासनाच्या माझा लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करतांना खालील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आह :-
- महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा.
- शैक्षणिक कागदपत्रे.
- आधार कार्ड.
- उत्पन्नाचा दाखला.
- पासपोर्ट साईज फोटो.
- मोबाईल नंबर.
अर्ज कसा करावा
- महाराष्ट्र सरकारच्या माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत नोकरीच्या ट्रेनिंगसह महिन्याच्या स्टायपेंडचा लाभ घेण्यासाठी, अर्जदाराला ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.
- माझा लाडका भाऊ योजनेचा ऑनलाइन अर्ज हा महास्वयम्ं वेबसाइटवर उपलब्ध आहे.
- तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना या नावानेही ऑनलाइन अर्ज फॉर्म शोधू शकतात.
- अर्जदाराला प्रथम नोकरी शोधणारा म्हणून स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- नोंदणीसाठी आधार क्रमांक गरजेचा आहे.
- नोंदणीनंतर अर्ज करणाऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी आयडी व पासवर्ड प्राप्त होईल.
- प्राप्त झालेल्या नोंदणी आयडी व पासवर्डसह वेबसाइटवर लॉगइन करावे.
- योजनेच्या यादीतून माझा लाडका भाऊ योजना किंवा मुख्यमंत्री युवाकार्यप्रशिक्षण योजना निवडावी.
- वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती,शिक्षणाची माहिती, बँक खात्याची माहिती आणि इतर लागणारी संबंधीत माहिती माझा लाडका भाऊ योजनेच्या ऑनलाइन अर्जायामध्ये भरावे.
- कागदपत्रे स्कॅन केलेल्या स्वरूपात अपलोड करावे.
- भरलेली सर्व माहिती तपसावी आणि अर्ज सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करावे.
- भविष्यात वापरण्यासाठी माझा लाडका भाऊ योजना अर्जाची झेरॉक्स काढून घ्यावी.
- महाराष्ट्र सरकारचे कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग प्राप्त झालेल्या अर्जांनची तपासणी करतील.
- नोकरीच्या ट्रेनिंगसाठी निवडलेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबद्दल एसएमएस द्वारे सूचित करण्यात येईल.
- अर्ज करणाऱ्या तरुणांना महाराष्ट्र सरकारच्या माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत नोकरीचे ट्रेनिंग आणि महिन्याचे स्टायपेंड ६ महिन्यांचे मिळेल.
- माझा लाडका भाऊ योजनेबद्दल काही मदत लागल्यास लाभार्थी युवक त्यांच्या कौशल्य विकास जिल्हा कार्यालय, उद्योजक्ता मार्गदर्शन केंद्राला भेट देऊ शकतात.
महत्वाच्या लिंक्स
- महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजना ऑनलाइन अर्ज फॉर्म.
- महाराष्ट्र महास्वयम्ं वेबसाइट.
- महाराष्ट्र कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग वेबसाइट.
- महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजना इंग्रजी मार्गदर्शक तत्वे.
- महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजना मराठी मार्गदर्शक तत्वे.
संपर्क माहिती
- महास्वयम्ं हेल्पलाइन नंबर :- १८००१२०८०४१.
- कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग हेल्पलाइन नंबर :-
- ०२२-२२६२५६५१.
- ०२२-२२६२५६५३.
- कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग ईमेल:- helpdesk@sded.in.
- कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र ,
मादाम कामा रोड,हुतात्मा राजगुरू चौक ,
मुंबई - ४०००३२.
Scheme Forum
Person Type | योजना प्रकार | Govt |
---|---|---|
क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: नोकरी
Sno | CM | Scheme | Govt |
---|---|---|---|
1 | Agnipath Scheme | केंद्र सरकार | |
2 | PM Employment Linked Incentive Scheme A: First Timers | केंद्र सरकार | |
3 | PM Employment Linked Incentive Scheme B: Job Creation in Manufacturing | केंद्र सरकार | |
4 | PM Employment Linked Incentive Scheme C: Support to Employers | केंद्र सरकार | |
5 | Bima Sakhi Yojana | केंद्र सरकार |
Subscribe to Our Scheme
×
Stay updated with the latest information about महाराष्ट्र माझा लाडका भाऊ योजना
Comments
certificate wagera bhi…
certificate wagera bhi milega kya
Mi.changla.ahe
Sarv.anubhav.ahe
Job
Good
नवी प्रतिक्रिया द्या