प्रधानमंत्री कुसुम योजना

author
जमा करणार shahrukh on Sat, 27/07/2024 - 13:39
केंद्र सरकार CM
Scheme Open
Pradhan Mantri Kusum Yojana Logo
हायलाइट्स
  • शेतकरी त्यांची अनुत्पादक किंवा बागायती जमीन सौरऊर्जा प्रकल्पांसाठी वापरू शकतात.
  • तुम्हाला राज्य आणि केंद्र सरकारकडून प्रत्येकी 30% सबसिडी मिळेल.
  • शेतकरी उत्पादित वीज डिस्कॉम्सला विकू शकतात आणि वर्षाला 60,000-1,00,000 रुपये कमवू शकतात.
  • याद्वारे शेतकरी वीज निर्मिती करू शकतात, त्यांच्या जमिनीला सिंचन करू शकतात, आर्थिक पाठबळ मिळवू शकतात आणि अक्षय ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन देऊ शकतात.
Customer Care
  • पीएम कुसुम योजना टोल फ्री क्रमांक :- १८००१८०३३३३.
  • पीएम कुसुम स्कीम हेल्पडेस्क ईमेल :- pmkusum-mnre@gov.in.
योजनेचा आढावा
योजनेचे नाव प्रधानमंत्री कुसुम योजना.
वर्ष लाँच केलेले २०१९.
फायदे भारतीय शेतकऱ्यांसाठी ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी.
लाभार्थी भारतीय शेतकरी.
नोडल मंत्रालय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय.
सब्स्क्रिप्शन योजनेचा अपडेट मिळविण्यासाठी येथे सदस्यता घ्या.
अर्ज करण्याची पद्धत PM KUSUM अर्ज ऑनलाईन सबमिट करू शकतो.

परिचय

  • आपल्या देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे न वापरलेली किंवा नापीक जमीन आहे जी पुनरुत्पादनक्षम नाही.
  • भारत सरकारने अशी अडचण लक्षात घेऊन अशा जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची कल्पना केली.
  • आणि २०१९ रोजी केंद्र सरकारने पीएम कुसुम योजना सुरु केली.
  • प्रामुख्याने, हि योजना दोन उभयांवर काम करते, पहिली तुम्ही सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करू शकता आणि तयार केलेली वीज DISCOMs ला विकू शकता किंवा तुम्ही जमीन भाड्याने देऊ शकता आणि भाडे मिळवू शकता.
  • दुसरी तुम्ही तुमच्या सिंचनासाठी सोलर पंप लावू शकता आणि उर्वरित वीज घरांसाठी वापरली जाऊ शकते किंवा तुम्ही ती DISCOMs ला विकू शकता.
  • या योजनेत, ज्या शेतकऱ्यांकडे नापीक,पाणथळ किंवा ग्रीड क्षेत्राबाहेरील जमीन आहे ते सौरऊर्जा प्रकल्प बसवू शकतात.
  • सौरऊर्जा प्रकल्प शेतकरी स्वतः: लावू शकते किंवा विकासकांना त्यांच्या जमिनी भाड्याने देऊ शकते.
  • शेतकरी सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ला विकू शकते आणि पुढील २५ वर्षासाठी दरवर्षी ६०,००० ते १ लाख रुपये कमवू शकते.
  • शेतकरी त्यांच्या सिंचन गरजा पूर्ण करण्यासाठी ७.५ एच पी क्षमतेचा सौर कृषी पंप देखील स्थापित करू शकते, विशेषतः: ग्रीडच्या बाहेर असलेल्या भागात.
  • केंद्र आणि राज्य सरकार एकूण खर्चाच्या प्रत्येकी ३०% सबसिडी देते.
  • एकूण खर्चाच्या उर्वरित ४०% रक्कम बँकेकडून ३० वर्षाच्या कालावधीसाठी कर्ज समझून घेता येईल.
  • सोलर पंप तुमच्या पारंपरिक डिझेल जनरेटची जागा घेऊ शकते आणि जितकी रक्कम डिझेलची वापरली गेली असेल तितकी रक्कम कर्जाच्या परतफेडीसाठी वापरली जाऊ शकते.
  • याद्वारे, तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड पुढील ५-६ वर्षात सहज करू शकते.
  • नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडून पीएम कुसुम योजनेसाठी शेतकरी सहजपणे ऑनलाईन अर्ज करू शकते.
  • २०२६ मार्चद्वारा, ३४,८०० मेगावॅट जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी ३४,४२२ कोटी आर्थिक सहाय्य्य देण्याची शक्यता आहे.

योजनेचे फायदे

  • पीएम कुसुम योजनेच्या मदतीने, सरकारचे उद्दिष्ट अक्षय ऊर्जा स्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देणे आहे, विशेषतः: सौर ऊर्जेचा.
  • या योजनेसाठी सौर पंप लागवण्यासाठी आणि त्यावर आधारीत तंत्रज्ञानासाठी अनुदान आणि प्रोत्साहन देईल. असे केल्याने, आपण हवामानातील बदल कमी करू शकते आणि शाश्व्त पर्यावरणासाठी योगदान देऊ शकते.
  • शेतकऱ्यांना कृषी आणि घरगुती कारणांसाठी स्वतः:ची वीज निर्माण करण्यास सक्षम करते.
  • शेतकरी ग्रीडच्या बाहेर असले तरीही यांच्या शेतात सिंचन करण्यास सक्षम करते.
  • पीएम कुसुम योजना तीन भागामध्ये विभागळी आहे आणि सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे.
    घटक अ घटक ब घटक क
    या योजनेअंतर्गत, शेतकरी/ विकासक/ सहकारी/ पंचायती/ शेतकरी उत्पादक १०,००० मेगावॅटचा सोलर प्लांट लावू शकते. या योजनेअंतर्गत, वैयक्तित शेतकरी ऑफ-ग्रीड क्षेत्रात स्वतंत्र सौर कृषी पंप लावू शकते. या योजनेअंतर्गत, ३५ लाख ग्रीड जोडलेले कृषी पंप वैयक्तित पंप आणि फिडर लेव्हल सलरायझेशनद्वारे सोलराइज केले जातील.
    हा सोलर प्लांट ग्राउंड किंवा स्टील्ट माउंट केला आहे. यासाठी, डिझेल पंप बदलण्यासाठी ७.५ एचपी क्षमतेपर्यंतचा स्वतंत्र पंप लावण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली. कृषी पंप ग्रीड जोडलेल्या वैयक्तित शेतकऱ्यांना मंडळ केली जाईल.
    या योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्र कोणतीही मदत करणार नाही. किंवा, तुम्ही तुमची उत्पन्न केलेली वीज DISCOMs ला विकू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्ही केंद्र आणि राज्याकडून प्रत्येकी ३०% सबसिडी घेऊ शकते, शेतकरी ४०% उर्वरित देतील. केंद्र ३०% (NER/टेकडी/बेटांसाठी ५०% पर्यंत) अनुदान देईल.
    बँक खर्चाच्या ७०% पर्यंत कर्ज देऊ शकते.
    शेतकरी योगदान कमी करण्यासाठी राज्ये अतिरिक्त अनुदान देण्यास मोकळे आहेत.
    शेतकऱ्यांचा नापीक/ पडीक/ कुरण/ पाणथळ/ लागवडीयोग्य जमिनीत जास्तीत जास्त ५०० किलोवॅट ते २ मेगावॅटचा अक्षय ऊर्जा जनरेटर लावू शकते. आपण दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त पंप स्थापित करू शकते किंवा आर्थिक सहायय ७.५ एचपी पर्यंत मर्यादा आहे. असे शेतकरी त्यांच्या सिंचन गर्जेसाठी उत्पन्न केलेली सौरऊर्जा वापरू शकते आणि जास्त निर्माण झालेली वीज DISCOMs ला निश्चित दराने विकली जाते.
    ३१ जानेवारी २०२४ पर्यंत,४७६६ सौर क्षमता मंजूर आणि १६५. क्षमता स्थापित केलेली आहे. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत, १२९४७८७ स्टॅण्डलोन पंप मंजूर करण्यात आले त्यापैकी २८५८२३ पंप बसविण्यात आले. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत, १६१२०४ IPS मंजूर झाले त्यापैकी २११७ IPS  स्थापित करण्यात आले. तर ३३७६४६६ फिडर स्तरिय पंप मंजूर आणि ५२६७ यशस्वीरीत्या बसविण्यात आले.

पात्रता

  • शेतकऱ्यांकडे स्वतःची जमीन पाहिजे.
  • ज्यांच्याकडे ग्रामीण भागात जमीन आहे, ग्रीड क्षेत्राबाहेर आहे आणि ज्यांच्याकडे ती लावण्यासाठी पुरेशी जमिन आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल.
  • तुमची जमीन इलेक्ट्रिक सब स्टेशनच्या ५ किमी त्रिज्येच्या आत असणे गरजेचा आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पीएम कुसुम अर्ज सबमिट करण्यापूर्वी, लाभार्थ्यांची कागदपत्रांची यादी ठेवली पाहिजे खालीलप्रमाणे दिली आहे :-
    • शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे.
    • लीज करार (असल्यास)
    • बँक खाते तपशील.
    • खसरा खताउनी नंबर.
    • पत्ता पुरावा.
    • पासपोर्ट साईज फोटो.
    • स्व -घोषणा पत्र.
    • जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र.
    • अर्जदाराचा ओळख पुरावा :-
      • आधार कार्ड.
      • मतदार ओळखपत्र.
      • पॅन कार्ड.
      • चालक परवाना.

अर्ज कसा करावा

  • पीएम कुसुम योजनेसाठी पात्र आणि इच्छुक शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकता.
  • प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा इवम उत्थान महाभियान योजनेचा अर्ज ऑनलाईन सबमिट करण्यासाठी, तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला जाव लागेल.
  • या योजनेअंतर्गत, तुमही पीएम कुसुमसाठी राज्यावर अर्जाची लिंक मिळेल.
  • पोर्टलवर गेल्यानंतर, लाभार्थींना त्यांची जमीन भाडेततवावर द्याची आहे कि सौर कृषी पंपामध्ये स्वारस्य आहे यापैकी पर्याय निवडावा लागेल.
  • अर्जामध्ये विचारलेले सर्व तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्जाचा अंतिम सबमिशन करण्यापूर्वी त्याचे पुनरावलोकन करा.
  • सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला त्याच्या तपशिलसह (जसे कि नोंदणी क्रमांक) यशस्वी नोंदणी संदेश प्राप्त होईल.

महत्वाची लिंक्स

संपर्काची माहिती

  • पीएम कुसुम योजना टोल फ्री क्रमांक :- १८००१८०३३३३.
  • पीएम कुसुम स्कीम हेल्पडेस्क ईमेल :- pmkusum-mnre@gov.in.
  • नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय,
    अटल अक्षय ऊर्जा भवन, CGO कॉम्प्लेक्स,
    लोधी रोड, नवी दिल्ली - ११०००३.

क्षेत्रासाठी जुळणाऱ्या योजना: कृषिशास्त्र

Sno CM Scheme Govt
1 Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) केंद्र सरकार
2 Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) केंद्र सरकार
3 राष्ट्रीय कृषि बीमा योजना केंद्र सरकार
4 प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना केंद्र सरकार
5 Kisan Call Center (KCC) केंद्र सरकार
6 Fertilizer Subsidy Scheme 2022 केंद्र सरकार
7 National Agriculture Market (e-NAM) केंद्र सरकार
8 Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana केंद्र सरकार
9 Micro Irrigation Fund केंद्र सरकार
10 Kisan Credit Card केंद्र सरकार
11 ग्रामीण भण्डारण योजना केंद्र सरकार

Comments

नवी प्रतिक्रिया द्या

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.