विषय :- बँक ऑफ बरोदा विरोधात फसवणूकीची तक्रार

Description
सर / मॅडम, मी तक्रार करणारी श्रीमती. मानसी राजाराम गांवकर असून मी डोंबिवली, ठाणे, महाराष्ट्र येथे वास्तवास आहे. माझे देना बँक , शाखा मुलुंड (पूर्व ), मुंबई या बँकेत खाते 2020 पासून आहे. कोरोना मध्ये काही कारणास्तव मला बँकेत जाता येत नसल्याकारणाने मी हे खाते बंद करण्यासाठी जानेवारी -2021 ला देना बँकेला पत्र दिले होते. त्यानंतर कोरोनामुळे बँकेत जाता आले नाही. मला वाटले माझे खाते बंद केले असेल. म्हूणन मी SVS बँक , राजाजी पथ शाखा, डोंबिवली या नवीन बँकेत खाते उघडले. 2024 साली मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना आली त्यासाठी मी फॉर्म भरला व त्या फॉर्म मध्ये SVC बँकेची माहिती भरली होती. दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेचा पहिला हाप्ता ₹=3000/- बँक ऑफ बरोदा, मुलुंड या बँकेत जमा झाला कारण ती बँक आधार कार्ड सी लिंक होती म्हणून. सर, मी देना बँक खाते बंद केले होते व त्यानंतर देना बँक ही बँक ऑफ बरोदा मध्ये सामील झाली हे मला माहिती नव्हते. माझ्या खात्यातही झिरो रक्कम होती. देना बँकेने माझे खाते बंद केले नाही व दोन्ही बँकेनी मला कोणतीही माहिती माझ्या मोबाईल वर पाठविली नाही. जेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तेव्हा मला समजले की माझे मुलुंडमधील बँक खाते चालु आहे व हे खाते बँक ऑफ बरोदा मध्ये सामील झाले आहे. मी मुलुंड येथे बँक ऑफ बरोदा मध्ये जाऊन चोकशी केली असता बँकेकडून माझे खाते ऍक्टिव्ह आहे व खात्यात फक्त्त ₹ 3000/- जमा आहेत हे कळाले. त्यानंतर मी तेच खाते चालु ठेवण्यासाठी पत्ता बदलण्याचा फॉर्म भरला तसेच आधार व पॅन कार्ड देऊन KYC केली. चेक बुक व ATM साठी फॉर्म भरला व हे दोन्ही माझ्या नवीन पत्यावर डोंबिवली येथे पोस्टाने घरी पोच झाले. परंतु बँकेने मला कोणतीही इतर माहिती दिली नाही व 02 ऑक्टोबर 2024 ला मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचे दुसरा हाप्ता ₹=1500/- जमा झाला व माझ्या खात्यात एकूण रक्कम ₹ 4500/- शिल्लक होती. 02 ऑक्टोबर 2024 पासून बँकेने माझ्या खात्यातील रक्कम ₹=2600/- कमी करून घेतले व याचा मेसेज मला 03 ऑक्टोबर 2024 रोजी प्राप्त झाला. यासंदर्भात माहितीसाठी मी दिनांक 05 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता बँक ऑफ बरोदा, मुलुंड मध्ये गेले असता, बँकेत असणारे कर्मचारी म्हणतात की आपल्या खात्यातील रक्कम कमी आहे. आमच्या बँकेतील कमीत कमी मर्यादा रक्कम ही ₹2000/- इतकी आहे. माझ्या खात्यात अडीच वर्ष रक्कम झिरो होती म्हणून त्यांनी दंड स्वरूपात रक्कम कापून घेतली व बजाज फायनान्स कडून काही रक्कम कापली गेली आहे, परंतु बजाज फायनान्स चे कोणतेही व्यवहार सध्या मी करत नाही व पूर्वी केलेले होते तेही पूर्ण झालेले आहेत. या सर्व कारणामुळे माझी रक्कम कमी झाली. बँकेने आपली रक्कम कापून घेतली त्यामुळे खात्यातील रक्कम कमी मर्यादित रक्कमेच्या कमी झाल्यामुळे बँकेने पुन्हा रक्कम दंड स्वरूपात कापून घेतली. मी बँकेत विश्वासाने पैसे ठेवले होते या बँकेने मला कोणतीही माहिती न देता माझ्या खात्यातील रक्कम कापून माझी फसवणूक केली आहे. देना बँकेत कमीत कमी ₹=1000/- ठेवण्याची मर्यादा होती व बँक ऑफ बरोदा ची मर्यादा ₹=2000/- आहे हे बँकेने ग्राहकास कळविणे गरजेचे आहे. सरकारकडून मला जी मदत भेटली होती तीही मदत मला कोणतीही माहिती न देता बँकेने दंड स्वरूपात वसुल केली. मी या सर्व घटनेचा विरोध करते. सरकारकडून मिळालेल्या मदतीमध्ये बँक हस्त्तक्षेप करु शकत नाही तसेच बँकेत अडीच वर्ष माझ्या खात्यात झिरो रक्कम असताना मला कोणतीही सेवा व मदत पुरविली नाही व मोबाईल वर मेसेजद्वारे कळविळेही नाही मग कोणत्या आधारावर पैसे कापून घेतले. म्हणूनच मी आपल्याकडे या बँकेची तक्रार नोंदवित आहे . आपण मला योग्य तो न्याय द्याला अशी आशा व मन:पासून विश्वास आहे. तसेच आज दिनांक 05 ऑक्टोबर 2024 रोजी मी माझे बँक ऑफ बरोदा चे खाते पूर्णपणे बंद करण्यासाठी फॉर्म भरला आहे. मी सोबत काही फोटो जोडत आहे. मानसी राजाराम गांवकर.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.