प्रधानमंत्री आवास योजना/ मोदी आवास योजना

Description
मा.महोदय,                   मी सुचिता रविंद्र चिबडे , राहणार  गाव- गोमेंडी, ग्रामपंचायत- वराठी, तालुका - महाड, जिल्हा - रायगड.            प्रधानमंत्री आवास योजना/ मोदी आवास योजना करीता ग्रुप ग्रामपंचायत- वराठी येथे मा. ग्रामसेवक श्री. एम.एल.भस्मे आणि मा. सरपंच श्रीमती. सेजल कासारे यांना बऱ्याच वेळा पत्रा सहित (कागदपञे)आधार कार्ड प्रत, मतदान कार्ड, रेशनकार्ड, असेसमेंट उतारा, घरपट्टी, उत्पन्नाचा दाखला, जातिचा दाखला, जाॅब कार्ड, बॅंक पासबुक प्रत,इत्यादी दिले आहेत.             मी ह्या योजनेकरीता पात्र असून देखील माझे प्रस्ताव मंजूर करत नाहीत. त्यांनी मला गेली ४ वर्ष वारंवार नव्याने अर्ज करण्यास सांगितले असता, मी त्या अर्जांची पुर्तंता करून देखील अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. मी गेली कित्येक वर्षे घरपट्टी कर भरून देखील मी बेघर आहे .मी शारीरिकदृष्ट्या अपंग असून देखील मला ग्रामपंचायत अधिकारी सहकार्य करीत नाहीत.           संबंधित गट विकास अधिकारी (पंचायत समिती महाड) यांच्याकडे देखील पत्र पाठवून कळविले होते. तरिही त्यांनी सुध्दा दखल घेतली नाही.            योजनेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्र आपल्या माहितीस्तव खालील प्रमाणे सादर करीत आहे. योग्य ती कारवाई करून आम्हाला कळवावे, आपण या तक्रारीची  दखल लवकरात लवकर घ्यावी हि विनंती . आपली आभारी , सुचिता रविंद्र चिबडे. (९५९४५८५०३०) pravinchibade05@gmail.com

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.